Breaking News

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिमीचा फरार सदस्य ताब्यात


मुंबई, - नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिमीच्या सदस्याला आज सकाळी ताब्यात घेतले. याचे वय 34 वर्षे असून त्याच्यावर 2001 मध्ये कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो फरार झाला. तो परदेशात वास्तव्याला असून या आधीही अनेकदा तो भारतात येऊन गेला आहे. अखेर आज त्याला ताब्यात घेऊन कुर्ला पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेण्यात आले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित सदस्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता व मुंबई पोलीस अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तो पो लिसांना आधीच हवा होता.