Breaking News

भीमा कोरेगावच्या निषेधार्थ मुकमोर्चा


अहमदनगर : भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयांयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नगर शहरात शुक्रवारी पुरोगामी संघटनांच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला होता.या घटनेला जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जुन बस स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हा मोर्चा बंगालचौकी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.