Breaking News

व्यासपीठ मिळत असल्यामुळे तेही चित्रपटात यशस्वी होतील: दत्तात्रय पाचपुते


काष्टी /प्रतिनिधी /- शहरी भागातीलच मुल-मुली करीअर मध्ये पुढे असतात असे नाही. तर त्यांना योग्य दिशा मिळत नाही म्हणून मागे राहतात. पण आज सर्व सुविधा जवळच मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना सुध्दा करिअर मध्ये चांगली संधी मिळत असल्याने त्याच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असल्यामुळे तेही चित्रपटात यशस्वी होत आहेत. असे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते म्हणाले.
श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथील घोड व भिमानदीच्या संगमावर दि.१ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या हस्ते मंगळसुत्र या कौटुंबिक मराठी चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाला चित्रपटाचे लेखक अरुण अण्णा जगताप दिग्दर्शक दिपक जामखेडकर. निर्माते मनीषा गिरी. मदन गडदे. अभिनेत्री कोमल गुलदगड. सचिन गोटे. एकनाथ शिंदे. सचिन भागवत. बंडू नवले. हरिओम भागवत. रविंद्र शिंदे. गौरव जगताप. अविनाश चव्हाण. दिपाली भालेकर. उषा शिर्के. सचिन चव्हाण. प्रशांत चौधरी. आंजुम खान. दिपाली भाले. यांच्या सह अनेक कलाकार ग्रामस्थ हजर होते.

मंगळसुत्र हा मराठी चित्रपट संपूर्ण कौटुंबिक व भावनिक असुन ग्रामीण भागातील सर्व चालीरीती वर आधारित आहे. याचे संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण हे तालुक्यातील काष्टी. सागंवी. दौंड या परिसरात होत असल्यामुळे यामध्ये बरेचसे कलावंत. व्हिडिओ ग्राफर हे तालुक्यातील असल्यामुळे माहेरची साडी नंतर हा पहिलाच भावनिक चित्रपट आहे. असे दिग्दर्शक दिपक जामखेडकर सांगतात