Breaking News

रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी


पारनेर / प्रतिनिधी : तालुक्यातील बहिरोबावाडी -धोत्रे रस्त्यावर मोढवे वस्ती भागात ३०० मी. रस्त्याच्या दोन्हीं बाजुकडील असणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्हीं बाजुंचे चर बुजवून रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. तसेच दोन्हीं बाजूने काटेरी झुडूपांनी रस्ता पुर्णपणे झाकोळून गेलेला असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करण्यास नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली असुन, अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे . त्या अनुषंगाने बहिरोबावाडी , किन्ही येथील नागरिकांनी २२ डिसेंबर रोजी शेतकरी नेते राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांची भेट घेऊन सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती.
नागरिकांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महसुल विभागाचे पारनेरचे मंडलधिकारी सचिन औटी व किन्हीचे तलाठी मसलेकर यांनी अतिक्रमण केलेल्या रस्त्याची पाहणी केली .पाहणी करून सदर माहिती पारनेर तहसिल कार्यालयास देण्यात येईल. हा रस्ता जि.प.अहमदनगरच्या सा.बां.विभागाकडे असल्याने त्या विभागास सदर अतिक्रमण हटवण्यासाठी च्या सुचना पारनेरच्या तहसीलदार यांच्या लेखी पत्राद्वारे देण्यात येतील असे त्यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.

शेतकरी नेते अनिल देठे पाटील , किन्हीचे सरपंच बाबासाहेब व्यवहारे , विठ्ठल तुकाराम देठे , बबन देठे , रामभाऊ व्यवहारे , नाथा देठे , संभाजी देठे , गवराम देठे , विठ्ठल देठे , पांडुरंग व्यवहारे , यशवंत व्यवहारे , मल्हारी व्यवहारे , शिवाजी आचार्य , सुनिल साबळे , पोपट व्यवहारे , राजेंद्र व्यवहारे , भिकाजी व्यवहारे , कुंडलीक देठे , आबाजी खोडदे , राजेंद्र खोडदे , बाळासाहेब व्यवहारे , समीर शेख , झुंबर ठाणगे आदी शेतकरी उपस्थित होते