जिजाऊंच्या लेकी आयोजित वधु वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद
मेळाव्याचे उदघाटन सहभागी झालेल्या ५ वधुंच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. आप्पासाहेब शेटे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ , कुंदाताई गुंजाळ , त्रिमुर्ती प्रतिष्ठान च्या सुमतीताई घाडगे , मराठा सोयरीक ग्रुपचे संचालक जयकिसन वाघ,अशोक कुटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातुन बाळासाहेब वाकचौरे यांनी आधुनिक व तांत्रिक युगात व्हाटस्अप तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळ आणि कमी श्रमात सोयरीक जमविण्याचा उद्देश असुन ,असे मेळावे सर्वाँच्याच हिताचे असल्याचे सांगीतले.
