सोनईत बिबट्याकडून दोन कालवडीचा फडशा; गावकऱ्यांमध्ये दहशत
सकाळी उठून पाहता दोन्ही जनावरे मृत्यू मुखी पडल्याने परिसरात दहशत निर्माण होऊन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांत व शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे . या बाबत मिळालेली माहिती अशी की, कुंडलिक नामदेव गडाख वस्तीवर राहत असून त्यांच्या घरासमोर जनावराचा गोठा आहे. ते नेहमी प्रमाणे बांधून घरात झोपले असता, मध्यरात्री दोन च्या सुमारास बिबट्याने हल्ला चढून जवळपास तीस हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनास्थळी वन अधिकारी ढेरे, जाधव, डॉक्टर मेहेत्रे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सर्वत्र बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.