Breaking News

रायगड : जेएनपीटी बंदरातून 50 किलो सोने जप्त


रायगड, - न्हावा शेवा येथील जेएनपीटी बंदरातून 50 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे 15 कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. सिंगापूरहुन समुद्रामार्गे मुंबईला हे सोने आणले जात असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सीमाशुल्क विभागाने सापळा रचून सोन्याची तस्करी करणार्‍यांचा डाव हाणून पाडला.