तालुका फेडरेशनच्या अध्यक्षपदी पाचपुते बिनविरोध
संचालक म्हणून प्रा. तुकाराम आप्पाजी दरेकर, एकनाथ आनशिराम आळेकर, मिठू पर्वती शिंदे, ज्ञानदेव बापूराव कोल्हटकर, सुनील शिवाजीराव दरेकर, ज्ञानदेव रामभाऊ हिरवे, बापूसाहेब हरिभाऊ गोरे, सुनील फुलचंद मुनोत आणि प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडी आगामी पांच वर्षासाठी आहेत. श्रीगोंदे तालुक्यात एकूण ६७ पतसंस्था असून, त्यापैकी ३० पतसंस्था फेडरेशनच्या सभासद आहेत. राहिलेल्या ३० पतसंस्थांना साभासद होण्याचे आवाहन फेडरेशनने केले आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
