Breaking News

मुलींनी जीवनात निर्भय बनून क्रांतिकारक बदल घडवावेत - डॉ छाया भालशंकर.

पाथर्डी: शहर प्रतिनिधी/- मुलगी हि समाजात अन्याय, अत्याचार व दबावाला नेहमीच बळी पडते. हे टाळण्यासाठी मुलींनी शारीरिक ,मानसिक व भावनिक आरोग्याच्या विकासातून निर्भयतेकडे वाटचाल करावी. बदलत्या परिस्थितीत मुलींनी निर्भय होणे आवश्यक असून सकारात्मक विचार करून तसेच सावित्रीबाई फुले यांच्यापासून आदर्श घेऊन जीवनात क्रांतिकारक बदल घडवावेत असे वक्तव्य शेवगाव येथील डॉ छाया भालशंकर यांनी केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ' निर्भय कन्या अभियान कार्यशाळेत' निर्भय कन्या काळाची गरज या विषयावर त्या बोलत होत्या.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अँड. अरुणा मोरे (महिला कायदेतज्ञ) तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ शंकर चव्हाण , समन्वयक डॉ बबन चौरे, डॉ सुभाष शेकडे, ग्रंथपाल प्रा किरण गुलदगड, डॉ अजय पालवे आदी उपस्थित होते. अँड. अरुणा मोरे यांनी मुलींना महिला विषयक कायद्याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा वैशाली आहेर यांनी, सूत्रसंचालन प्रा प्रिया माळी तर आभार प्रा डॉ बबन चौरे यांनी मानले.