Breaking News

पुण्यातील मालधक्का चौकातून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण


पुणे : पुण्यामधील मालधक्का चौकात फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या दिड वर्षाच्या बाळाचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास घडला. राजस्थान येथील काही लोकांनी या मुलाचे अपहरण केल्याचे समजतेय. भीक मागण्यांसाठी बाळाचे अपहरण करण्यात आले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.