Breaking News

पाणी पुरवठा करण्यासाठी करावे लागतात असाही काही फंडा


अहमदनगर / प्रतिनिधी :- महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विभागांना पाणीपुरवठा केला जातो, हा पाणी पुरवठा करण्यासाठी जे व्हॉल्व्ह असतात, ते अधिकाधिक प्रमाणात रस्त्याच्या बाजूला किंवा रस्त्याच्या मध्यभागीच असलेले दिसून येतात, मग यामुळे रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असताना या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते, किंवा याकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा त्या तयार झालेल्या रस्त्याला खड्डे करण्याचे वेळ मनपा वर येते.
आज शहरातील एका विभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडणार्‍या काकांना आपली दुचाकी गाडी बॅरिकेटस् म्हणून तीचा वापर करावा लागला. बॅरिकेटस् शहरामध्ये कमी प्रमाणात असल्यामुळे अशा वेळी मनपा कामगारांना कामे करत असताना अशा प्रकारच्या शक्कल लावाव्या लागतात.शहरातील रस्त्यांची रूंदी वाढल्यामुळे कदाचित हे पाणी सोडण्याचे व्हॉल्व्ह रस्त्यांच्या मध्यभागी आले असल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर मनपाकडून काहीतरी पर्याय शोधणेही तितकेच महत्वाचे आहे.