Breaking News

आ.थोरातांच्या प्रयत्नांतून खांबे येथे गरजूंना मोफत गॅस, शालेय दाखले व साहित्याचे वाटप.


संगमनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा अग्रेसर ठरला आहे. शासनाच्या विविध योजना वाडी वस्तीवर व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना पोहचावण्यासाठी यशोधन कार्यालयामार्फत सातत्याने प्रयत्न केला जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून खांबे येथील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उवला योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन शालेय साहित्य व विविध दाखल्यांचे कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. 
या कार्यक्रम प्रसंगी बाजार समितीचे सभापती शंकर पा. खेमनर, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, संचालक इंद्रजीत थोरात, किरण मिंडे, जि.प. सदस्या सौ. मिराताई शेटे, सरपंच सौ. शोभा जोरी, के. के. थोरात, रघुनाथ दातीर, माधव दातीर, तुकाराम दातीर, प्राचार्य सातव आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 84 लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन व 12 मुलींसाठी सायकली तसेच शालेय विद्यार्थ्यांचे डोमासाईल, डोंगरी, राष्ट्रियत्व, शेतकरी, जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले कि, आमदार बाळासाहेब थोरात हे विकासाचे दृष्टी असलेले नेते आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून सर्व सामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना तालुक्यात यशस्वीपणे सुरु आहे. खांबे व साकुर भागात अनेक विकास कामे मार्गी लागली आहे. वृक्षतोड केल्याने पर्यावरणाचा र्‍हास होतो. हा र्‍हास थांबविण्यासाठी इंधनासाठी लाकडाऐवजी गॅसचा वापर केल्याने लाकूडतोडीचे प्रमाण कमी होईल. यासाठीच माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली मोफत गॅसचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले. या प्रसंगी नवनाथ आरगडे, शंकर पा. खेमनर यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी रामदास जोरी, आनंदा दातीर, किसन मुठे, गजानन भोईर, जनसेवक संजय केदार, शिक्षक वृंद, शिकेतर कर्मचारी, ग्रामस्त, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.