Breaking News

गाव विकासाचे स्वप्न पहाणाऱ्यांसाठी गाव कारभारी परिषदेचे आयोजन


नगर त प्रतिनीधी- आपल गाव विकसीत झाले पाहीजे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने हातभार लावत असतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर प्रयत्न होतच असतात त्या प्रयत्नांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर विकासाची गती नक्कीच वाढू शकते.सत्तेवर नसणारे, सत्तेवर असणारे आणि गाव विकासाचे स्वप्न पहाणारे प्रत्येक जण गावाचा विकासात विकासकाची भूमिका कशी निभावू शकतो, यासाठी औरंगाबादचे भास्करराव पेरे, नागपूरच्या योगिता गायकवाड, हे तर पाणी संवर्धना संदर्भात बाळासाहेब शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
नगर तालूका पत्रकार संघ आणि कृषी उत्पन्न् बाजार समिती यांनी गाव कारभारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आदर्श गाव योजनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार असणार आहेत. तसेच यावेळी आ. शिवाजीराच कर्डीले, आ.अरूणकाका जगताप, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, प्रशांत शिर्के, पंचायत समिती गटविकास अधिकारी सय्यद अलमास आदी उपस्थित असणार आहेत. 

.औंरंगाबाद मध्ये ३३५० लोकसंख्येच्या आणि ६०२ कुटूंब संख्या असणारे पाटोदा हे गाव आहे. या गावात लोकांना गरम पाणी, दळण आणि आरओ चे पाणी मोफत दिले जाते. गावात २४ तास पाणी आहे.गावातील प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला जातो.हे सरपंच भास्करराव पेरे यांनी कसे करून दाखविले याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. शितलवाडी-परसोडा ता.रामटेक जि.नागपूर येथील योगिता गायकवाड या उच्चशिक्षीत तरूणी राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच झाली. पाण्याचे दुर्भिक्ष पाहून १४ गावांसाठीची बंद पडलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना २०१४ साली चालवण्यास घेतली.रात्रीचा दिवस करत रणरागिणी प्रमाणे काम करत आजही ती योजना नफ्यात सुरू आहे. गावातील नळांना फेडरल बसवून सर्वत्र सारख्याच दाबाने पाणी पुरवठा त्यांनी सुरू केला आहे. लेक वाचवा अभियान, स्त्री भ्रुण हत्या विरोध यासाठी पथनाटयातून जनतेला मार्गदर्शन केले. त्यांच्या कामाची दखल भारत सरकारच्या निती आयोगाने घेत त्यांना आयोगाच्या बैठकीसाठी महिला कर्तबबार सरपंच सदस्य म्हणून दिल्लीलाही बोलविण्यात आले होते.त्या आपले अनुभव कथन करणार आहेत. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नगर तालूक्याला पाणीदार करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील कशा उपाययोजना करता येतील. शासकीय मदतीविना लोकसहभागातून हे कसे शक्य आहे हे पाणी फौंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे सांगणार आहेत.

उपस्थितांसाठी लकी ड्रॉ
गाव कारभारी परिषदेसाठी उपस्थीत असणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ आयोजन करण्यात आले आहे. शारदा एजन्सी आणि श्री ट्रेडर्स यांच्या कडून अॅक्सेस गाडी, शेतकरी सेवा केंद्राकडून स्प्रींकलर सेट,राम एजन्सी मार्फत ३९ इंच एलसीडी टिव्ही,, कोमल अॅग्रो तर्फे विदयूत मोटार आणि ओमसाई एजन्सी कडून पिठाणी गिरणी देण्यात येणार आहे.