राहुरी प्रतिनिधी :- वांबोरी येथे तूर खरेदी केंद्र सुरु होत आहे. राज्यशासन तुरीची खरेदी ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी कागदपत्रे खरेदी विक्री संघाचे राहुरी येथील कार्यालयात जमा करून नाव नोंदणी करावी, असे करण्याचे आवाहन तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांनी केले. ते म्हणाले, की सन् २०१७ ते २०१८ या वर्षासाठी शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात तालुका खरेदी विक्री संघ, नाफेड व राज्य मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तूर खरेदी पिकांची ऑन लाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी तूर पिकांची नोंदणी राहुरी तालुका खरेदी विक्री संघाचे कार्यालयात करावी. यासाठी शेतकऱ्यांनी नावनोंदणी करताना आधार कार्डची झेराँक्स, ७/१२ उतारा (पिकाच्या नोंदी सह ), बैंक पास बुक झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी कागपत्रांची पूर्तता करून खरेदी विक्री संघाच्या राहुरी येथील मुख्य कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष संतोष पानसंबळ यांनी केले आहे.
वांबोरीत तूर खरेदी केंद्र सुरु होणार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:35
Rating: 5