Breaking News

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर .


कोपरगाव / प्रतिनिधी दि .11 कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी कोपरगाव सार्वमत कार्यालयाचे उपसंपादक नानासाहेब शेळके यांची तर उपाध्यक्षपदी फकीर टेके व कार्याध्यक्षपदी सिध्दार्थ मेहेरखांब यांची निवड करण्यात आली आहे . कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या शाखा प्रत्येक तालुक्यात आहेत. राज्यात 

कुठेही पत्रकार बांधवांना काहीही अडचणी आल्यास संघटने चे पदादिकारी यांची मदत होते .संघटनेच्या वतीने आज पर्यंत अनेक राज्य स्तरीय मेळावे घेतले आहेत तसेच वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. यावेळी लक्ष्मण जावळे यांची सचीव पदी तर खजिनदार पदी हेमचंद्र भवर ,सहसचिवपदी रवींद्र साबळे ,प्रसिद्धीप्रमुख -संजय लाड ,निवृत्ती शिंदे ,शमीम शेख आदिंची नियक्ती करण्यात आली आहे .

सदर बैठकीत संघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे माहिती अध्यक्षानी दिली . या बैठकीस शिवाजी गायकवाड ,पंडित भारूड ,माणिकराव उगले ,अरुण आहेर ,नानासाहेब मोरे ,शिवाजी जाधव,गहिनीनाथ गुले ,जलिल अत्तार ,राजेंद्र तासकर ,विनोद जवरे ,काकासाहेब खर्डे यांचेसह पत्रकार उपस्थित होते .