Breaking News

जीवधन किल्ल्यावरील वानरलिंगी सुळका चढताना दोन ट्रेकर दरीत कोसळले


पुणे, - जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात जीवधन किल्ल्यावरील वानरलिंगी सुळका चढताना दोन ट्रेकर दरीत पडल्याची घटना घडली आहे. या दोघा ट्रेक रना स्थानिकांनी दरीतून बाहेर काढले आहे. येथील एका स्थानिक रुग्णालयात या ट्रेकरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जुन्नरचे ट्रेकर आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शरण सावंत व प्रणव सावंत हे दोघे ट्रेकर भोर येथून जुन्नरला आले होते. ते दोघे 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली.