परिसर स्वच्छता उपक्रमातून नववर्षाचे स्वागत
प्रथम कागद, प्लास्टिक, दगड, झाडाची पाने गोणीत गोळा करण्यात आले. त्यानंतर बांधकामासाठी आणलेली रस्त्यावर पसरलेली वाळु खोर्याने ओढून ती पुन्हा रस्त्यावर येवू नये. म्हणून विटाचे कठडे करण्यात आले. गवत काढून झाल्यावर खराडे व झाडुने झाडून परीसर स्वच्छ करण्यात आला . लहान मुलांची ही स्वच्छता मोहीम सुरू असताना येणारे जाणारे त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते.
परीसर स्वछता करण्यासाठी गोविंदा देशपांडे, साईश परदेशी, यश सोनवणे, ओम देशपांडे, शौर्य बल्लाळ , रूद्र जोशी , रूद्र देवचक्के , वरद देशपांडे , वैभव आडगावकर , भैरवी भांबरे , रेणुका देवचक्के, साक्षी देशपांडे, अनुष्का जोशी आदींनी परिश्रम घेतले.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरला तरूण मुले डिजेच्या मोठ्या आवाजात थिरकण्याचा आनंद घेतात. त्यांनी या लहान मुलांच्या उपक्रमाचे अनुकरण केल्यास नववर्षाच्या स्वागताचा आनंद वाढेल.