नुकसान झालेल्या भीम अनुयायांना आर्थिक मदत देण्याची मागणी
या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करावी, भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत इत्यादी मागण्याही श्री. हंडोरे यांनी केल्या. राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेणार नाही, तसेच समाजातील वातावरण दूषित करणाऱ्यांची गय करणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबन कांबळे, दिलीपदादा जाधव, शशिकांत बनसोडे,राजेंद्र वाघमारे, भाऊ सुरवाडे, कैलास अरवडे, एन.के. कांबळे, विद्याधर जांभोरकर, नंदू गायकवाड आदी उपस्थित होते.
