Breaking News

मुंबई उच्च न्यायालयावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा जबरी दरोडा

1 करोड रुपयांच्या वर मुद्देमाल चोर बाजारात; श्री. विजय बापट (शाखा अभियंता) यांची बदली.
श्री. अरविंद गाजरे (माजी शाखा अभियंता) यांचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकुती गंभीर!!! 



मुंबई/विशेष प्रतिनिधी ;- मुंबई उच्च न्यायालयावर आजी-माजी शाखा अभियंता यांनी मिळून किमान 1 करोड रुपयांचा जब्बरी दरोडा टाकला. न्याय मंदिरावर दरोडा टाकणाचा इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे बांधकाम विभागातील माहितगार सुत्रधारांकडून समजते. चोर, दरोडेखोर, खूनी, बलात्कारी, लोकांना अद्दल घडावी व सामाजिक समतोल, शांतता नांदावी या उदात्त हेतूने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना लिहिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली, अशा पवित्र न्याय मंदिरात बांधकाम खात्याचे अधिकारी सरकारी माल स्वतःची जहागिरी समजून सरकारी साधन संपत्ती चोरून विकू लागले आहेत. 

मे. सवानी कंन्ट्रक्शन कंपनीने सन 2015 रोजी खुल्या निविदा प्रणालीनुसार हेरिटेज दर्जा असणारी व मुंबई शहरच्या वैभवात मानाचा तुरा समजली जाणारी ही वास्तुकलेचा उत्कृष्ट नमूना असणारी मुंबई उच्च न्यायालयाचे दुरूस्तीचे काम मे. सवानी कंपनी 18 कोटी रुपयांना देण्यात आले होते. सदरचे काम इलाखा शहर विभागांतर्गत श्री. शशिकांत घाडगे (उप अभियंता) मलबार हिल, उपविभाग, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले.

सदरचे 18 कोटी रुपयांचे काम पूर्ण केल्यानंतर सरकारी तिजोरीतून मे. सवानी कंट्रक्शन कंपनीला देयके अदा करण्यात आली. परंतु एका प्रश्‍नचे कोडे काही केल्या सुटेनासे झाले. ते म्हणजे बीटीसी लाकडाच्या दरवाजे, खिडक्या, अलमारी, जुनी कपाटे, टेबल, खुर्च्या इत्यादी सामान जे काम करतांना निघाले ते गेले कोठे? कोणाच्या परवानगीने गेले? विना निविदा माल कसा विकला? जर निविदा काढली होती तर त्याची कोणत्या दैनिकात जाहिरात दिली होती? किती कंपन्यानी हा माल घेण्यासाठी निविदा भरल्या होत्या? या सार्‍या प्रक्रियेतून शासनास किती लाखांचा महसूल जमा झाला? या सार्‍या प्रश्‍नांची सोडवणूक होण गरजेचे होते. परंतु या बाबी कडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. याबाबत आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी दिनांक 29/11/2017 रोजी मुंबई उच्च न्यायालयात 80 लाखांची चोरी झाली असून सदर चोरीचा मास्टर माईंड श्री. विजय बापट (शाखा अभियंता) यांना उक्त गंभीर प्रकरणी तात्काळ निलंबित करुन चोरीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बांधकाममंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. 

बांधकाम मंत्री महोदयांच्या आदेशानुसार मुख्य अभियंता मुंबई श्री. केडगे यांना 7 दिवासांत अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. परंतु जाणीवपूर्वक मुख्य अभियंत्यांना चौकशी अहवाल देण्याचे टाळाटाळ करण्यात आली. श्री. शशिकांत घाडगे (उपअभियंता) मलबार हिल, यांनी दिनांक 1/1/2018 रोजी श्री. अरविंद सूर्यवंशी (अधिक्षक अभियंता) मुंबई यांच्याकडे चौकशी अहवाल दिला. अहवाल गंभीर असल्याचे समजते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 5 मधून शनिवार व रविवारी गेटपास क्रमांक 700 ते 710 या नंबरने 11 ट्रक माल चोरीला गेल्याचा मोठा पुरावा हाती लागल्यानेच सार्‍या भ्रष्टाचारी अधिकांर्‍याची पाचावर धारण बसली आहे. अहवाल देणारे उपअभियंता श्री. शशिकांत घाडगे अहवाल देऊन गायब झाल्याचे समजते. घाडगे यांच्याशी सल्लामसलत करून मुंबई अधिक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी पसार झाल्याचे समजते. दोघांच्या मिलीजुली भगत संगतीने बिचार्‍या मुख्य अभियंता श्री. केडगे यांची गोची झाली असल्याने ते प्रचंड चिडले असून हे दोन्हीही अधिकारी त्यांना दाद देत नसल्याने प्रकरण चिघळत चालले आहे.
श्री. शशिकांत घाडगे (उपअभियंता) यांनी दिलेल्या अहवालामुळे श्री. अरविंद गाजरे (माजी शाखा अभियंता) यांनी आत्महत्या केल्याची बांधकाम विभागात दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. बापटला कात्रजचा घाट दाखवून स्वतःच्या मर्जीतील अधिकार्‍यांची नेमणूक करणे, असा तिहेरी डाव साधण्याचा खेळी-खेळ्याचे बोलले जात आहे.