Breaking News

चाइल्ड इंग्लिश स्कुलमध्ये कला व क्रिडा महोत्सवाचे आयोजन


बालाजी देडगाव /प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाइल्ड करिअर इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये अविष्कार कला व क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे संचालक अंबादास गोरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश महाराज चौधरी होते. या क्रिडा व कला सप्ताहात रंगभरण स्पर्धा, कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूचे प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, धावणे, कबड्डी, चमचा लिंबू, संगीत खुर्ची, लांब उडी, उंच उडी अशा विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. यावेळी पालकांसाठीही संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलांनी मैदानी खेळाकडे वळावे, मुलातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याचे शाळेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच मुक्ताबाई नगरे , शाळेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे, अशोक महाराज साळुंके, प्रा. नारायण कडू, डॉ. रवींद्र गोरे, मोहन नजन, पद्माकर मते, बाळासाहेब गव्हाणे, अनिल कर्डिले, हरिभाऊ ढगे, गजानन कपिले, अन्सार पिंजारी, भानुदास गव्हाणे, रमेश काळे आदी मान्यवर व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संदिप खाटिक, कैलास तांबे , शुभांगी काळे, कविता लेंभे, मिनाक्षी मुंगसे, लक्ष्मण मुंगसे, छाया सातपुते, अंकिता सातपुते, आरती जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.