Breaking News

सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांच्या सचिवांना नाकारली भेट

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांना भेट नाकारली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकारपरिषद घेतल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहे. या प्रकारानंतर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले. मात्र शनिवारी सकाळीच पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना भेटायले गेले होते. पंरतू भेटण्यापूर्वी अपाईंटमेंट घेतली नसल्याचे कारण देत सरन्यायाधीशांनी प्रधान सचिवांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. 


त्यामुळे नृपेंद्र मिश्रा यांना सरन्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानापासून परत माघारी फिरावे लागले. सरन्यायाधिश दीपक मिश्रा हे केसेस वाटप करताना न्यायवव्यवस्थेने घालून दिलेले संकेत पाळत नसल्याचा गंभीर काल 4 मुख्य न्यायाधिशांनी केला होता. भारतीय न्यायव्यवस्थेत हे पहिल्यांदाच घडले. काल देशभर या प्रकारावरून मोठा गदारोळ माजला होता. भाजप सरकारवर न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप होत असून, म्हणूनच कदाचित सरन्यायाधिशांनी अशा परिस्थितीत प्रधान सचिवांना भेट नाकारल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर 4 मुख्य न्यायाधीशांमध्ये निर्माण झालेले मतभेद नक्कीच लवकर मिटतील आणि सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा देशाचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेनुगोपाल यांनी व्यक्त केली