Breaking News

राजमाता जिजाऊ एक आदर्श तर स्वामी विवेकानंद तरूणांची प्रेरणा ः प्रा. शेळके


भाविनिमगाव :- राजमाता जिजाऊ एक आदर्श माता होत्या त्यांच्या संस्कारांतून राजे शिवछत्रपतींनी राज्य स्थापन केले. आदर्शवत राज्यकारभार केला तर स्वामी विवेकानंद यांचे विचार तरूणांना कायम प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन प्रा. नंदकुमार शेळके यांनी केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. संदिप जरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष संजय काळे, ग्रा. सदस्य जालिंदर चेडे, सोमनाथ वाबळे, नवनाथ शेळके, राहुल मरकड, राजेंद्र जरे, शंकर शेळके, बाबासाहेब खडके, राजु शिंदे, सोपान जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. राजु शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले.