Breaking News

तातडीने रस्ता खुला करा!अन्यथा जलसमाधी घेऊ ! ढोरसडे ग्रामस्थांचा इशारा

शेवगाव / प्रतिनिधी । तालुक्यातील ढोरसडे गावच्या शेतकर्‍यांनी, रहदारीचा रस्ता खुला करावा नाही, तर जलसमाधी घेऊ! असा निर्वाणीचा इशारा शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.शेतजमीन गट नंबर 55, 2, 56, 2, 54, 49 या जमिनीतून येण्या - जाण्यासाठी रस्ता खुला करावा यासाठी येथील शेतकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. 


मात्र शासकीय पातळीवर याची कोणतीही दखल घेतली गेली नसल्यामुळे 11 जाने. 2018 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गट नं. 56/2 मध्ये उपोषणास बसणार आहोत याची दखल शासनाने न घेतल्यास 13 जाने. 2018 रोजी वेळ पडली तर जलसमाधी घेऊ असा निर्वाणीचा इशारा येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.


या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, अहमदनगरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रांताधिकारी पाथर्डी, आमदार मोनिका राजळे यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी निवेदनावर अनिकेत गोसावी, दत्तात्रेय माळवदे, ज्ञानदेव खंबरे, भगवान काळे यांच्या सह्या आहेत.