Breaking News

महा. राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धा आदर्श पुरस्कार जाहीर

पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धा आणि सामाजिक आदर्श पुरस्कारसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रकांत दरंदले (अहमदनगर), व्दितीय गणेश लंघे (शिरसगाव), तृतीय गितांजली बोरुडे (पारनेर) उत्तेजनार्थ वैष्णवी डमाळे (भातकूडगाव ) यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देवून गौरविण्यात येणार आहे. 


तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सहा व्यक्तींना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिली. दि. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस या दिवशी राज्यभर पत्रकार दिन साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धा पार पडल्या. तसेच सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींनाही जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार पुढीलप्रमाणे - सामाजिक क्षेत्र - मीराबक्ष बागवान ( वडाळा महादेव श्रीरामपूर ) शैक्षणिक क्षेत्र- सोनाली मुंढे (संगमनेर) प्रशासकीय - पत्रकारिता- कांदळकर मनीषा (कोपरगाव), आरोग्य - डॉ. विकास बेडके (बक्तरपूर - शेवगाव ) यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. आध्यात्मिक आदर्श पुरस्कार ह. भ. प. रमेश महाराज जाधव ( चेडगाव ) जनजागृती आदर्श पुरस्कार हमीद अमीन सय्यद ( भातकूडगाव ), दि. 6 जानेवारीला भातकुडगाव हायस्कूलच्या भव्य प्रांगणात बक्षीस वितरण, आदर्श पुरस्कार प्रदान व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे याच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले भूषविणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जेष्ठ नेते दिलीप लांडे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, तहसिलदार दिपक पाटील, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, शिवशंकर राजळे, जि. प. सदस्य रामभाऊ साळवे, सुनील दानवे यांच्यासह परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी निबंध स्पर्धेतील विजेते व पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींनी व तालुक्यातील पत्रकारांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्खेने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामीण संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक खोसे, ता. उपाध्यक्ष शंकर मरकड, सोपान जाधव, आत्माराम कुंडकर, रवींद्र मडके, अशोक वाघ, रामनाथ रुईकर, सलीम शेख, शिवाजी खरड, लक्ष्मण काशीद, बाळासाहेब पानकर, सुनील रनमले, भागचंद कुंडकर यांनी केले आहे.