Breaking News

सेनापती करीयर अकॅडमी तर्फे साविञीबाई फुले जयंती साजरी


पारनेर/प्रतिनिधी /- क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची १८७ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणुन सुधाकर महांडुळे उपस्थित होते. यावेळी महांडुळे बोलताना म्हणाले की मुलीनी पांरपारीक गोष्टीत अडकुन न पडता आधुनिक शिक्षणाची कास धरली पाहिजे.तसेच श्वेता वाघ यांनी आपल्या भाषणात समाजातील मुलीनी साविञीबाईचे विचार डोळ्यासमोर ठेवले. तर यश मिळवणे सहज शक्य होईल.सेनापती अकॅडमीचे संचालक प्रा.रामदास आढागळे यांनी सांगितले की समाजातील स्ञी आणि वंचित घटकाला फुले वेचता यावीत म्हणुन या घटकासाठी महात्मा फुलेंनी व साविञी बाईनी गोवऱ्या वेचल्या.साविञीबाईचे जीवन चरीञ डोळ्यासमोर ठेवले तर मुली कुठल्याही शेञात यशस्वी होवु शकतात.असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.

सामाजिक शेञाचे भान ठेवुन, सेनापती करियर अकॅडमी च्या वतीने पारनेर तालुक्यातील अपंग मुलामुलीनी स्पर्धा परीक्षा विषयी मोफत मार्गदर्शन देण्याची तयारी दर्शवली. यावेळी अकॅडमी विद्यार्थीनी आल्हाट रोशनी ,देशमाने भाग्यश्री, बोरूढे भाग्यश्री ,सोनवणे रुपाली, सुपे मुक्ता ,धादवड मोनिका बोद्रे कल्पना ,कचरे मीना धराडे वैशाली मधे रेश्मा या पोलीस भरती कोर्स मधील काही मुलींनी सावित्री बाई फुलेंची जयंती सम्पूर्ण देश भर शिक्षिका दिन म्हणून साजरी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.