मिरजगाव /प्रतिनिधी /- इंटरनेट व मोबाईलच्या अतिप्रमाणामुळे लहान मुलांवर त्याचा अतिशय वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे आपली एक संपूर्ण पिढी बरबाद होईल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी वेळीच सावध होवून सिद्धि समाधी योगच्या माध्यमांतून लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून आजवर अनेक बालकांना योग, प्राणायाम व योग्य आहाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. असे मत गुरुवर्य बलभीम मुळे यांनी व्यक्त केले आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे २५ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत सिद्धि समाधी योग शिबिराच्या समारोप प्रसंगी गुरुवर्य बलभीम मुळे बोलत होते. याकार्यक्रमास पद्मा मुळे , प्रशिक्षक दत्तात्रय गांगर्डे, प्रभाकर तरटे, संतोष गांगर्डे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, आनंदराव गांगर्डे, अशोकराव ढगे, संतोष लोळगे, संजय ढगे, रामकृष्ण गांगर्डे, मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील निमगांव गांगर्डा येथे योगा शिबीर संपन्न.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:07
Rating: 5