मालवणच्या अस्मितेचा गौरव !
सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - पोलीस अधिकार्यांच्या पहिल्या महिला बॅच मधील पोलीस अधिकारी एसीपी अस्मिता मोरे-भोसले यांचा मायभूमीत सत्कार करून गौरव करण्यात आला. पोलीस दल महिलांसाठी खुले झाले त्यावेळी नाशिक येथून पहिल्या 21 महिला अधिकार्यांची बॅच बाहेर पडली त्यातीलच एक अस्मिता मोरे-भोसले. अस्मिता यांनी आपले पदवी शिक्षण स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्याल मालवण येथून पूर्ण केले. याच महाविद्यालयात केलेल्या सत्कार सोहळ्यात प्राध्यापक वर्ग व माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना त्याने त्या काळातील आठवणी जागविल्या.
यावेळी बोलताना अस्मिता मोरे म्हणाल्या, ज्या मालवणमध्ये मी घडले त्या मालवणची मी कायमच ऋणी राहीन. खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडत गेले. खेळामुळे स्पर्धा करण्याची ईर्षा निर्माण होते. याचा मला भावी आयुष्यात खूप फायदा झाला. ज्या काळात मुलींना ’सातच्या आत घरात’ अशी परिस्थिती होती, त्या चौकटीतून बाहेर येत मुंबईला राहून पोलीस दलात सामील झाले व स्वतःचे नवीन विश्व निर्माण केले आणि स्वातंत्र्य सैनिक असलेल्या वडिलांची अपेक्षा पूर्ण केली. हे भावपूर्ण उद् गार आहेत एका ’मुलीचे’ ज्या मुलीने स.क ा.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण मधून 1984 मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे पोलीस दलात अधिकारी बनलेल्या त्यावेळची मालवणची ’वेगाची राणी’ अर्थात धावपटू व कबड्डी खेळाडू अस्मिता मोरे व आताची सौ. अस्मिता भोसले, मुंबई पोलीस दलातील ’असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस’ (-उझ) हिचे. प्रथमच पोलीस दल महिलांसाठी खुले झाले त्यावेळी नाशिक येथून पहिल्या 21 महिला अधिकार्यांची बॅच बाहेर पडली त्यातील एक अस्मिता मोरे/भोसले हिने पदवी शिक्षण पार पडले त्या स.क ा.पाटील सिंधुदुर्ग महाविद्याल मालवण येथील सत्कार सोहळ्यात प्राध्यापक वर्ग व माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना त्या काळातील आठवणी जागविल्या.
या वेळी अस्मिता मोरे यांनी सध्याच्या ’स्मार्ट फोन’ वापरातील धोके स्पष्ट करताना स्मार्ट फोनचा वापर काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला. सायबर क्राईम मध्ये वाढ झाली असून पास वर्ल्ड मागून फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. अनोळखी व्यक्तीचा कॉल आल्यास समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे जाणून घेतल्यानंतरच उत्तरे देण्याचा सल्ला दिला. तसेच पालकांनी मुलांना स्मार्ट फोन पासून दूर ठेवण्याचे आवाहन केले.