Breaking News

भविष्य निधीच्या नावाखाली कामगारांना लाखोंचा गंडा


डोंबिवली, दि. 12, जानेवारी - कामगारांच्या पगारातून भविष्य निधीच्या नावाने पैसे कापून ते पैसे भविष्य निधीमध्ये न टाकता कंपनी मालकाने परस्पर लांबवाल्याची घटना डों बिवलीमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनी मालक मंगेश जडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली एम.आय.डी.सी. परिसरात मंगेश जडे यांच्या मालकीची पाउंड रबर स्टॅम्प ही कंपनी आहे. या कंपनीत एकूण 15 कामगार काम करतात. जडे यांनी या कामागरांच्या पगारातून एप्रिल 17 ते नोव्हेंबर 17 पर्यंत काही ठराविक रक्कम एकूण सुमारे 1 लाख 56 हजार 453 रुपये भविष्य निधी साठी कापून घेतले. मात्र ही रक्कम भविष्य निधी मध्ये न टाकता स्वतःच्या फायद्याकरिता अपहार केला. ही बाब लक्षात आल्याने भविष्य निधी प्रवर्तन अधीकारी मुकुंदा सदावर्ते यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असुन या तक्रारी नुसार पोलिसानी कंपनी मालक मंगेश जडे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.