डोंबिवली, दि. 12, जानेवारी - डोंबिवलीतील पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील जानकी स्मृती बिल्डींग येथील प्रसिद्ध अॅपेक्स रूग्णालयामध्ये येत्या रविवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत ॠमुळव्याध, भगेंद्र व फिशर या आजारांवर अद्यावत उपचार या संदर्भात मोफत तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे. सदर शिबीर तज्ञ सर्जन डॉ. जितेंद्र निसळ ( एमबीबीएस,एम.एस,एफ.एम.ए.एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. नाव नोंदणीसाठी अॅपेक्स हॉस्पिटल 9773335564 किंवा 0251-2480449/785 वर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.
डोंबिवलीतील अॅपेक्स रूग्णालयात मोफत आरोग्य शिबीर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:35
Rating: 5