शिर्डीच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री. साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्या निमित्ताने शिर्डी येथील साईनगर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबीरास 900 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करुन या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
या महा रक्तदान शिबीराचे उदघाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते व संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, प्रताप भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी शिर्डी, कोपरगांव व राहाता येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी, विविध रक्तपेढ्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबीरात विविध राज्यातील साईभक्तांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. तसेच यावेळी चला हवा येऊ द्या या मालिकेतील अभिनेता भारत गणेशपुरे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, प्रखेर अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, शिर्डी ग्रामस्थ, संस्थान कर्मचारी आदिंनी रक्तदान केले. तर कोपरगांव येथील रक्तदाते राजेंद्र सारंगधर यांनी या शिबीरात रक्तदान करुन रक्तदानाचे शतक पुर्ण केले. रक्तदान करणा-या रक्तदात्यांना संस्थानच्या वतीने प्रशस्तीपत्र देवून त्यांची श्री साईबाबांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. या शिबीराकरीता श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी व श्री साईनाथ रुग्णालयाव्दारे नावनोंदणी करण्याकरीता 3 काऊंटर व रक्तदात्यांच्या मेडीकल तपासणी कामी 8 काऊंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.