Breaking News

मास्टर माईंडचा शोध घेवुन कठोर कारवाईची मागणी


पाथर्डी / प्रतिनिधी /- भिमा कोरेगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रकरणाचा निषेध करुन या घटनेचा मास्टर माइंडचा शोध घेवुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी. या प्रमुख मागणीसाठी सर्व संघटनानी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाथर्डीतुन संमिश्र प्रतिसाद मिळाला. कल्याण - विशाखापट्टणम हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. तर पाथर्डी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन या घटनेचा निषेध नोंदवला. 
यावेळी सर्व मोर्चेकरानी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. या घटनेला प्रशासन जबाबदार आहे. ही घटना महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणारी असून या कटामध्ये सामील असणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. सर्व समाजबांधवानी एक होऊन सर्वांनी डोकं शांत ठेवावे. या घटनेची पार्श्वभूमी समजून घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

या मोर्च्याला सकाळी आंबेडकर पुतळ्यापासुन सुरवात झाली . तहसिलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.प्रतिक खेडकर , शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीष पालवे , नगरसेवक प्रवीण राजगुरू , रमेश गोरे, महेश बोरूडे, प्रतीक खेडकर, बाबा राजगुरु वसंत बोर्डे , किशोर राजगुरू, रविंद्र आरोळे, दिगांबर गाडे, महेंद्र राजगुरू , सुरेश भागवत, सुभाष घोरपडे, अरविंद सोनटक्के ,हुमायुन आतार , मनसेचे अविनाश पालवे, लालभाई शेख, सुंदरदास कांबळे, जनता दलाचे माणिक दराडे, संजय शिरसाट, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरूडे, डॉ.एम.एम. लगड आदीसह सर्व पक्षीय कार्यकर्ते व विविध संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले. सुमारे एक तास रस्ता रोको करण्यात आला.आठवडे बाजार असल्याने दिवसभर बंद ठेवु नये असा निर्णय आंदोलकांनी घेतला होता