Breaking News

अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतने केली कारवाई


मिरजगाव /प्रतिनिधी /- मिरजगांव येथील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी केलेल्या कारवाई ने गो.रा.खैरनार ची आठवणी जाग्या झाल्या. कर्जत तालुक्यातील मिरजगावमधील गांधी मैदानमधील जागेवरील काही अतिक्रमण काढून ग्रामपंचायतीने आपल्या जागा ताब्यात घेवून त्यावर कुंपण केले. अशी कारवाई केल्याने मिरजगाव येथे खळबळ उडाली आहे. तर परिसरातील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
मिरजगाव हे जहागिरी गाव आहे. येथे गावातील सर्वच जागा जहागिरदाराच्या मालकीच्या होत्या. त्यामुळे या जागा जाहागीरीदाराने खाजगी लोकांना विकल्या आहेत. असा या लोकांचा दावा आहे. मात्र मिरजगावमधील मध्यावर्ती असणारे गांधी मैदान हे पूर्वी मोकळे मैदान होते. त्या जागेवर नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आली. त्यापैकी काही जागा आजही ग्रामपंचायत च्या नावावर आहे. मात्र ही जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली होती. सदरील जागा ग्रामपंचायत ताब्यात घेण्यास पुढे येत नव्हती. मात्र मिरजगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून शरद कवडे हे बदलून आल्यानंतर त्यांनी मिरजगाव येथील अतिक्रमणात लक्ष घातले आहे. 

मिरजगाव येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. ही अतिक्रमणे काढल्या शिवाय गावाला कोणतीही शिस्त लागणार नाही. हे लक्षात घेवून सर्व प्रथम गावातील गांधी मैदानातील ग्रामपंचायतचे जागे सभोवतीचे अतिक्रमण काढून टाकले आहे. व त्या जागेवर सकाळी व सायंकाळी भाजीमार्केट भरविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतच्या जागे सभोवतीचे अतिक्रमण काढून त्या जागेला तारेचे कुंपण करण्यात येणार आहे. व या गावच्या मध्यावर्ती जागेवर भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतच्या या कारवाईने सभोवतीच्या अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

गांधी मैदानातील जागा ग्रामपंचायतने ताब्यात घेतल्याने सभोवतीच्या जागा मालकांना रहदारीसाठी जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे अनेकांना अडचणीचे झाले आहे. तर काहीनी आपली दुसरी व्यवस्था लावलेली आहे. तसेच याच गांधी मैदानातील इतर जागा या खाजगी व्यावसायीक व ग्राममपंचायत यांच्यात वाद् आहेत. त्यामुळे त्या कित्येक वर्षांपासून न्यायालायीन प्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मिरजगावच्या गांधी मैदानाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळणार आहे. अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. मिरजगाव ग्रामपंचायतिने गावातील अतिक्रमणाचा प्रश्न हाती घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.