Breaking News

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.


नेवासा/ शहर प्रतिनिधी/- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नेवासा नगर पंचायतीच्या सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय बर्डे गटनेते सचिन नागपुरे, नगरसेवक रणजित सोनवणे, भारत डोकडे, दिनेश व्यवहारे, महिला कर्मचारी मनिषा मापारी, श्रीमती बागवान श्रीमती तवले कर्मचारी विलास आर्ले, राजु सोनवणे, योगेश गवळी, बंडू चक्रनारायण, प्रताप कडपे आदी उपस्थित होते.

तसेच पसायदान प्रतिष्ठाणच्या वतीने आज जिजाऊ माँसाहेब स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पो.नि.लोखंडे साहेब यांच्या हस्ते मॉसाहेब व स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पारखे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी मा.सरपंच सतिष गायके, नगरसेवक मा.रणजित सोनवणे, मा.दिनेश व्यवहारे,मा.सचिन नागपुरे,मा.टेकाळे भाऊ, सुधीर चव्हाण, गणेश भागवत, बाबा डुकरे, दत्ता गिते, महेश बोरूडे, पंकज शिंदे, महेश पारखे, विशाल रासकर आदी.उपस्थित होते. जिजाऊ जयंती व युवादिन साजरा केल्याने अनेक नेवासेकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.