Breaking News

आत्मा मालिक शुटींगक्लबमुळे देशाला चांगले शुटर मिळतील -


कोपरगांव ता.प्रतिनिधी :- आत्मा मालिक संकुलामध्ये विविध क्रिडा प्रकारांची सुसज्ज व्यवस्था आहे. आजपासून शुटिंग क्लब विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. या शुटिंग क्लबच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय व पातळीवर आत्मा मालिकचे विद्यार्थी नेत्रदिपक कामगिरी करतील आणि देशाला चांगले शुटर मिळतील. येथील ध्यान अभ्यासामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व श्वासावरील नियंत्रण वाढीस लागते. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलामध्ये शुटींग क्लब व आत्मा मालिक मेळयाचे उद्घाटन पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 
त्यांचे समवेत पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, आश्रमाचे संत देवानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, वसंतराव आव्हाड, माधवराव देशमुख, बाळासाहेब गोर्डे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे सर्व विभागाचे प्राचार्य आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी कृष्णप्रकाश पुढे म्हणाले की, आत्मा मालिक शैक्षणिक सकुलामध्ये शिक्षणबरोबरच खेळांचे धडे देवून सक्षम व सशक्त भारतीय नागरिक घडविण्याचे कार्य करीन या संकुलात शिकणारा विद्यार्थी देशसेवेसाठी कामी येईल. शुटिंग क्लब राज्यात अतिशय कमी ठिकाणी आहे. आत्मा मालिकने हा शुटिंग क्लब सुरू करून जिल्हयातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आत्मा मालिकने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळालाही जे महत्व दिले आहे ते वाखाण्याजोगे आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक सुदृढतेबरोबरच राष्ट्र प्रेमाची भावना वाढीस लागते. आजच्या युवकांना एकत्रित करून खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले. यावेळी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने कृष्णप्रकाश यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कृष्णप्रकाश यांनी शैक्षणिक संकुलातील विविध प्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. तसेच रायफल शुटिंग करून स्वतःच्या नेमबाजीचे दर्शन उपस्थितांना दाखविले. 

दरम्यान शैक्षणिक संकुलातील आत्मा मालिक मेळाव्यात ३३ स्टॉल मध्ये १२५ विविध खाद्य पदार्थ मांडले असून त्याचा संकुलातील विद्यार्थी व पालक मनसोक्त आनंद घेत आहे. विद्यार्थ्यांना खेळाण्यासाठी ७ एकरावर गेम झोन उभारण्यात आला असून त्यात वैविध्य पूर्ण खेळणी मांडली आहे. तसेच आत्मा मालिकने स्वतःचा थ्रीडी थिएटर आर्ट व क्राफ्ट गॅलरी, रांगोळी प्रदर्षन, शैक्षणिक संकुलाला मिळालेल्या विविध पारितोषिकांचे प्रदर्शन, एज्युकेशन एक्सपो आदिंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून याचा लाभ सर्वजण घेत आहे. 

या आत्मा मालिक मेळा व आत्मविष्कार स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व विश्वस्त प्रकाश भट यांचे मार्गदर्शनाखाली प्राचार्य कांतीलाल पटेल, निरंजन डांगे, माणिक जाधव, संदिप गायकवाड, सुधाकर मलिक, रमेश कालेकर, नामदेव डांगे, अविनाश लोहार, आयटीविभागाचे आशिश रूणवाल, राहुल मतसागर यांचे सह अनेक शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहे.