Breaking News

व्हॉलीबॉल स्पर्धेत जयहिंद आश्रम शाळेचे यश.


संगमनेर (प्रतिनिधी) आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित आश्रमशाळा रायस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जयहिंद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम व थाळी फेक मध्ये व्दितीय क्रमांक मिळवत इतर खेळांमध्ये नेत्रदिपक यश संपादन केले असल्याची माहिती मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी दिली.
जयहिंद आश्रमशाळेच्या खेळाडूंनी 14 वर्ष व 17 वर्ष वयोगटातील मुली यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यामध्ये 17 वर्षे वयोगटातील संघ अजिंक्य ठरला आहे. या संघामध्ये दिपाली धादवड, वृषाली लहांगे, सुलोचना कडू, शकूंतला बगाड, पुष्पा पवार, पूनम पवार व सारिका लांडगे यांनी भाग घेतला होता. तसेच थाळी फेकमध्ये सानिका दिघे हिने व्दितीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे, पर्यवेक्षीका श्रीमती कोल्हे, प्राथ. विभागाचे मुख्याध्यापक संजय अंत्रे, क्रिडा शिक्षक थोरात, खेमनर, सौ. तांबे यांनी मार्गदर्शन लाभले.