Breaking News

सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अर्धनग्न फोटोही काढले

पुणे, - पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मोठ्या मुलीवरही वाईट नजर ठेऊन तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो या नराधाम बापाने काढले आहेत. मात्र याप्रक रणी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अविनाश प्रकाश लांडगे (वय-37 रा.खडकी) या नराधम सावत्र बापाविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने त्याच्याशी 2009 मध्ये विवाह केला होता. 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला एकटीला घरात थांबवून तिच्यावर अविनाश लांडगे या सावत्र बापाने अत्याचार केला.
गेल्या दोन वर्षापासून प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोबतच मुलींना तो मारहाणही करत होता. मोठ्या मुलीवर देखील त्याची वाईट नजर होती. अनेकदा त्याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्यास दाद लागू दिली नाही. यातून पुढे त्याने मोठ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे अर्ध नग्न फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. शेवटी त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आईसह सांगवी पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपी फरार झाला आहे. सांगवी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.