भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक - आरोग्यमंत्री
पालघर येथील दहा वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. पालघर येथील या मुलास त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नेण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरला निलंबित केले आहे. त्याचबरोबर १०८ क्रमांकासाठी सेवा पुरवठादार म्हणून काम करणाऱ्या कंपनीवर देखील चौकशी अंती कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
