कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन
दि. १ जानेवारी रोजी भीमाकोरेगाव येथील दलित बांधवावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ बुधवार दि.३ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बंद असताना मात्र, बुधवारी मिरजगावचा आठवडा बाजार असल्याने मिरजगाव मधील दलित संघटनानी गुरुवारी बंदचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळपासूनच बंद पुकारण्यात आला होता. अत्यावश्यक सेवा वगळता मिरजगावमधील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी मिरजगावमधील दलित संघटनांनी शहरातून निषेधाच्या घोषणा देत फेरी काढली. त्यानंतर मिरजगाव मधील क्रांती चौक येथे नगर सोलापूर महामार्गावर रास्तारोखो करण्यात आला.
