Breaking News

भायगाव जिल्हा परिषद शाळेचे सुयश


भातकुडगाव :- शेवगाव तालुक्यातील भायगाव जिल्हा परिषद शाळेला देवटाकळी येथे झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुनदर्शन स्पर्धेमध्ये भायगाव शाळेने घवघवीत यश मिळवले, यास्पर्धेत तालुक्यातील 17 शाळांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बक्षिसांवर भायगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविली, यामध्ये अनुक्रमे वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रद्धा दुकळे (तृतीय क्रमांक), हस्ताक्षर स्पर्धा वैष्णवी देशपांडे (द्वितीय क्रमांक), कथाकथन सादरीकरण प्राप्ती दुकळे (तृतीय क्रमांक), वैयक्तिक गीत गायन, संकेत दुकळे (प्रथम क्रमांक), वेशभुसेसह सादरीकरण वैष्णवी देशपांडे (प्रथम क्रमांक), समूहगीत गीत गायन (द्वितीय क्रमांक), सांस्कृतिक कार्यक्रम स्वच्छ व सुंदर गाव, आर्या आगळेसह समुह (प्रथम क्रमांक), या विविध स्पर्धेमध्ये शाळेतील गायत्री हर्षदा चव्हाण, निकिता शिंदे, अनिकेत दुकळे, ऋतिक भापकर, प्रवीण आढाव, ऋतुजा सौदागर, सोहम लोखंडे, प्रतीक सौदागर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, या विद्यार्थ्यांना सुखदेव शिंदे, रामभाऊ गवळी, अंबादास रुईकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी विद्यार्थ्यांचे भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, उपसरपंच संदीप शिरसाठ, राजेंद्र आढाव, अशोक देशपांडे, शहाराम आगळे, राजेंद्र दुकळे, भाजपचे माणिक शेकडे, केंद्र प्रमुख रमेश गोरे, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी अभिनंदन केले आहे.