सिडनी : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या सांघिक माऱ्यामुळे दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे. मिशेल आणि शॉन मार्श बंधूंनी शतक झळकवत पाचव्या गड्यासाठी रचलेल्या दीडशे धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ७ बाद ६४९ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या ३०३ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात इंग्लंडची ४ बाद ९४ अशी परिस्थिती झाली आहे. इंग्लंडचा संघ अद्यापही २१० धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे कसोटीच्या अंतिम दिवशी इंग्लंडवर पराभवाचे सावट दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत,इंग्लंडवर पराभवाचे सावट.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:30
Rating: 5