Breaking News

देवस्थान जमीनीवर अनेकांचा डोळा


कर्जत/प्रतिनिधी /- कुळ व फाँरेस्ट जमिनीचा घोळ मोठया प्रमाणात झालेला असुन ,त्या जमिनी लाटण्यासाठी काहीनी डाव रचला आहे. टाकलेला डाव आता उघडा पडू लागला आहे. गायरान, महारहाडोळा, कुळ देवस्थान इनाम व फाँरेस्ट वाटप शेकडो एकर जमीन घेण्यासाठी तालुक्यात चढाआेढ लागली आहे.
खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितल्याची माहीती समोर येऊ लागली आहे. या जमिनी विकत घेण्यास इच्छुक असणा-यामध्ये राजकीय पक्षाशी निगडीत नेत्यांचा समावेश आहे.

कर्जत येथील देवस्थान जमिनीची विक्रीकरून लाखो रुपये कमविल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. कर्जतच्या मुख्य रस्त्यावर असणारी ही जमीन कोट्यवधी रूपायाची असल्याने अनेकांचा डोळा या जमिनीवर आहे. ही जमिन देवस्थानला इनाम मिळाली आहे. या जमिनीची देखभाल पहाणारे ट्रस्टी यांनी नोटरी व धर्मदाय आयुक्त याच्या सहकार्याने विक्री केलेली आहे. या शिवाय कर्जत महसुल विभागाने चांगलाच हात आेला करत जमिनीची विक्री करण्यास परवानगी देवुन कमाई करून घेतली आहे.महसुल विभागाने नाशीक विभाागाचे आयुक्त यांना असणारे आधिकार वापरून बेकायदा जमिनीचा वर्ग बदलुन खरेदीस परवानगी दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.या बाबत सामाजीक कार्यकर्ते रामदास सुर्यवंशी यानी महसुल आयुक्त महेश झगडे याच्याकडे तक्रार दाखल केली आहे .