'आप'ची 'बदलेंगे मध्य प्रदेश' संकल्प यात्रा.
भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप पक्षातर्फे २ जानेवारी ते १८ मार्च २०१८ दरम्यान राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'बदलेंगे मध्य प्रदेश' या नावाने संकल्प यात्रा सुरू करण्यात येत असल्याची माहिती 'आप'चे राज्य संयोजक अलोक अग्रवाल यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, नवीन वर्षानिमित्त आप पक्षातर्फे राज्यव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत २ जानेवारी ते १८ मार्चदरम्यान राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघात 'बदलेंगे मध्य प्रदेश' संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट सरकार उलथून टाकणार असल्याचा दावा यावेळी अग्रवाल यांनी केला.