रस्ते अपघातात केंद्रीय मंत्री पटेल जखमी .
इलाहाबाद : उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद शहरात रविवारी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या ताफ्यातील चार वाहने आपापसात धडकली. या दुर्घटनेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल किरकोळ जखमी झाल्या. इलाहाबादच्या कोरांव भागातील गजनी ग्रामसभेत स्व. पी.एन. सिंगच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत ४ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने मंत्री पटेल यांना गंभीर इजा झाली नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.