शिवसेनेच्या सांगली महापालिका क्षेत्र युवा सेना प्रमुखपदी ऋषिकेश पाटील
सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांचा येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मेळावा पार पडला. त्यावेळी शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मेळाव्यात संजय विभुते यांच्याहस्ते ऋषिकेश पाटील यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. ऋषिकेश पाटील रॉयल्स युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष असून त्यांच्या या निवडीने युवावर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका क्षेत्रात शिवसेना वाढीच्या दृष्टीने ऋषिकेश पाटील यांचे योगदान मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा संजय विभुते यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यास शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेचे नगरसेवक शेखर माने, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर, जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्या सह अन्य मान्यवरांची आदी उपस्थित होते.
