पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांनी हैदोस घालत पुन्हा एकदा तोडफोडीच सत्र सुरु केले आहे. उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा आर्थिक फटका आणि मनस्ताप मात्र सर्वसामान्यांना भोगावा लागतोय. मागच्या दोनच दिवसात शहरातील थेरगाव, पिंपरी आणि रामनगर परिसरातील कित्येक वाहनं फोडण्यात आली. मात्र पोलिसांना त्याचं काहीही सोयरसुतक नाही आहे. गुन्हेगारांना पकडू, पथकं रवाना झाली आहेत, कठोर कारवाई करु, अशी सरकारी छापाची उत्तरं त्यांच्याकडून दिली जात आहेत.
