पारनेर महाविद्यालयात सिनियरच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये 'फ्रि स्टाईल'
सविस्तर वृत्त असे आहे की ,पारनेर महाविद्यालयात सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान कॉलेजचे वर्ग चालु होण्या अगोदरच दोन सिनियरच्या विद्यार्थ्यांमध्ये काल राञी सोशल मिडीयाच्या ग्रुपवर चँटींग करत असताना किरकोळ वाद झाला होता.या महाविद्यालयाची सहल येत्या दोन दिवसात बाहेरगावी जाणार असल्याने त्या सहलीची चर्चा चालु होती.या चर्चातून हा किरकोळ वाद झाला होता.यातील एक विद्यार्थी हा पारनेर तालुक्यातील जवळा गावचा आहे तर दुसरा हंगा या गावचा आहे.राञी चँटींग करताना किरकोळ वादाच रुपांतर सकाळी महाविद्यालयातील फ्रि स्टाईल हाणामारीत झाले.जवळ्याच्या विद्यर्थ्याने हंग्याच्या विद्यार्थ्याला राञीच दम दिला होता की सकाळी आल्यावर तुझा कार्यक्रमच करतो.
त्याप्रमाणे तो सकाळीच पाच सात मिञांसमवेत महाविद्यालयात आला होता.हंग्याचा हा विद्यार्थी आवारात उभा असताना त्यावर अचानक हल्ला करुन त्याच्या डोक्यात काहीतरी लोखंडी वस्तु मारल्याने त्याच्या डोक्याला जबर जखम झाली.तो रक्तबंबाळ झाल्याने सोबतच्या विद्यार्थ्यांनी त्याला शहरातल्या खाजगी दवाखान्यात घेउन गेले.नंतर जवळ्याचा हाणामारी करणा-या विद्यार्थ्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु झाला.पण हे विद्यार्थी नॉट रिचेबल झाल्याने पुढील अनर्थ टळला.महाविद्यालय परिसरात मुलीच्या कारणांवरुन सतत असे प्रकार चालु असतात. बसस्थानक वर तर दिवसातुन एकतरी प्रकार होत असतो.त्यातच धुम स्टाईल मोटार सायकल चालवणारांची भर पडत आहे.कॉलेज भरण्याच्या वेळातच हे धुमस्टाईल वाले रस्त्यांवरुन चाललेल्या विद्यार्थी नीना कट मारत असतात.या धुमस्टाईल वाल्याना शोधण्यासाठी कॉलेज रोडवरील सीसी फुटेज पाहुन त्यावर पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली तर खेड्यापाड्यातुन येणा-या विद्यार्थीनींना मोकळा श्वास घेता येईल.
