Breaking News

विद्यार्थी उच्च पदावर जावा अशी इच्छा शिक्षकाची असते: न्यायाधीश ए.जी. देशिंगकर


कुकाणा/ प्रतिनिधि / :- विद्यार्थी उच्च पदावर जावा अशी इच्छा आई-वडीला नंतर शिक्षकाची असते. ज्या गोष्टी करायला लाज, भिती वाटते व चोरून करव्या लागतात.तेव्हाच गुन्हा घडतो. अशी गुन्हेगारी माणसाचे आयुष्य बरबाद करते. आयुष्य खूप चांगले आहे, या वयात शिक्षणाला महत्त्व द्या असे प्रतिपादन नेवासा कोर्टाचे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश ए.जी. देशिंगकर यांनी केले. 
नेवासा तालुका विधी समिती, वकील संघ व कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुकाणा येथे मंगळवारी,९जानेवारीला आयोजित केलेल्या फिरते विधी साक्षरता शिबिरा प्रसंगी विद्यार्थ्यांना करताना कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर कुकाणा ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष अॅड देसाई देशमुख, उपाध्यक्ष एकनाथ कचरे, सचिव माजी आमदार पांडुरंग अभंग, सहसचिव शिवाजी गरड, विश्वस्त कुमारसाहेब देशमुख, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बी.जी.झावरे, सरपंच उज्ज्वला भोसले, माजी , उपसरपंच बाळासाहेब कचरे, आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड.देसाई देशमुख यांनी केले. विद्यालयाचे प्राचार्य भगवान देशमुख यांनी स्वागत केले. 

यावेळी बालकांचे हक्क, कायदेशीर सुविधा आणि संरक्षण बाबत योजना या विषयावर मार्गदर्शन करताना अध्यापक शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, बालकांना शिक्षण सक्तीचे आहे पण ते प्रगतीचे आहे. बालक हे उदयाचे आधार असुन तज्ञ,सुज्ञ, जाणकार असावेत, विद्यार्थ्यांचे हक्क, शिक्षण हा मुलभुत हक्क आहे. सर्वोत्तम आरोग्य, सामाजिक सुरक्षा यासाठी विशेष कायदे , संरक्षण आहे. सर्वापर्यंत सर्व शिक्षण पोहचणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी अॅड. अजय रिंधे, अॅड. भरत वर्मा, प्राचार्य भगवान देशमुख, अॅड. राखी बोरा, बाळासाहेब रिंधे, भारत गरड, नांदुरचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रख्माजी लिपणे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर खंडागळे यांच्या सह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अॅड. व्ही.एच. चंगेडीया यांनी केले तर अॅड. देवसिंह देशमुख यांनी आभार मानले.