अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा,अभिनेते सुनिल तावडे, अंकुश चौधरी उपस्थित राहणार.
अहमदनगर /प्रतिनिधी । 09 : अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा नगरमध्ये दि. 11 ते 14 जानेवारी 2018 दरम्यान सावेडीतील माऊली सभागृहात येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा स्पर्धेचे सहावे वर्ष असून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या 30 एकांकिका अंतिम फेरीत सादर होणार आहेत. स. 9 ते रात्री 9 या कालावधीत राज्यातील या दर्जेदार व विविध विषयांवर आशयसंपन्न एकांकिका पाहण्याची संधी नगरकर रसिकांना उपलब्ध झाली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अभिनेते सुनिल तावडे तर पारितोषिक वितरण समारंभास अभिनेते अंकुश चौधरी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नरेंद्र फिरोदिया व स्वप्निल मुनोत यांनी दिली. सादर एकांकिकासाठी सर्वाना मोफत प्रवेश असणार आहे.
राज्यातील रंगभूमीवरील हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत राज्यातील रंगकर्मींनी तब्बल 100 एकांकिका सादर केल्या. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून नितीन जावळे, सतीश शिंगटे, प्रवीण कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्राथमिक फेरीतून 30 एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या सर्व एकांकिका दि. 11 ते 14 जानेवारी या कालावधीत सादर होणार आहेत. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून समीक्षक अमित भंडारी, दिग्दर्शक, लेेखक प्रवीण तरडे, सिनेअभिनेते, दिग्दर्शक विकास कदम काम पाहणार आहेत, अशी माहिती महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा यांनी दिली. या स्पर्धेसाठी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सांघिक पारितोषिके : प्रथम क्रमांक 71 हजार 111 रुपये, अहमदनगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्र. 51 हजार 111 रुपये, करंडक आणि प्रमाणपत्र, तृतीय क्र. 31 हजार 111 रुपये करंडक आणि प्रमाणपत्र, चतुर्थ क्र.21 हजार 111 रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. उत्तजेनार्थ 5 हजार 111 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका 11 हजार 111 रुपये करंडक आणि प्रमाणपत्र त्याचप्रमाणे यावर्षी नगरच्या संघांसाठी विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहेत.
वैयक्तिक परितोषिके दिग्दर्शन ः प्रथम 2 हजार 111 रुपये, द्वितीय- 1 हजार 111 रुपये, तृतीय - 711 रुपये, उत्तेजनार्थ - 311 रुपये आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. अभिनेता/अभिनेत्री प्रथम- 1111 रुपये, द्वितीय 711, तृतीय - 511, उत्तेजनार्थ - 311 रुपये. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. यासह सहअभिनेता/अभिनेत्री, खलनायक / खलनायिका, विनोदी कलाकार, बाल कलाकार, प्रकाश योजना/ संगीत/ नेपथ्य, रंगभुषा/वेषभुषा, लेखन अशी विविध भागासाठी रोख रकमेची बक्षिसे, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रासह दिली जाणार आहेत. नगरकर रसिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे तसेच दर्जेदार एकांकिका पाहण्याचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.