मागासवर्गीय विद्यार्थीनींना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी सर्वांची - राजकुमार बडोले
बडोले म्हणाले की, तुळजापूर वसतिगृहासाठी 10 कोटीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर आहे तो लवकरच मंजूर करून घेण्यात येईल. विविध ठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडक रांच्या स्मारकांसाठी शासनाने निधी दिलेला आहे. काही स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करुन लवकरच ही कामेही पूर्ण होतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील वसतिगृहाबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील विविध मागण्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल. मुंबईतील इंदू मिलच्या ठिकाणचे काम पुढच्या महिन्यात सुरु होईल. त्याचबरोबर या जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठी कायमस्वरुपी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना येत्या दोन वर्षात घरे मिळण्याच्या दृष्टीने निश्चित व धोरणात्मक काम सुरु आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याची कामे शासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्याच तालुक्यात राहून शिक्षण घेता येणार आहे.