Breaking News

सत्कारामुळे जबाबदारी वाढत असल्याची जाणीव : काळे


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- विधानसभा मतदार संघातील जनतेचे मिळत असलेले प्रेम, सहकार्य व आशिर्वादाच्या जोरावर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची प्रेरणा मिळत आहे. मला विविध नामांकित संस्थांवर काम करण्याची मिळाली. मिळत असलेले पुरस्कार हे जनतेच्या प्रेमाचे प्रतिक आहेत. जनतेच्यावतीने होत असलेल्या सत्कारामुळे जबाबदारी निश्चित वाढली असल्याची जाणीव होत आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. 
राहाता तालुक्यातील वाकडी येथे जाहीर नागरी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व इंटीग्रेशन पीस इन्स्टिट्यूट यांच्यावतीने दिला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलंस पुरस्कार मिळाल्याबद्दल वाकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्यावतीने आशुतोष काळे यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील ११ गावातील नागरिकांनी जे प्रेम व सहकार्य माजी आ. अशोक काळे यांना दिले, तेच प्रेम व सहकार्य मलाही द्या. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुमच्या सहकार्याची व आशिर्वादाची गरज आहे. तुमच्या सहकार्याने वाकडी परिसर व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा सर्वागीण विकास करू.